रत्नागिरी : नगरपरिषदेच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पणाला मुख्यमंत्री येण्याची शक्यता

Sep 13, 2024 - 13:45
Sep 13, 2024 - 14:15
 0
रत्नागिरी : नगरपरिषदेच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पणाला मुख्यमंत्री येण्याची शक्यता

रत्नागिरी : रत्नागिरीकरांना सुदृढ जीवन जगता यावे, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहिलेले स्वप्न महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी पूर्णत्वास जात आहे. रत्नागिरी शहरातील मिस्त्री व्हिला येथील रत्नागिरी नगरपरिषदेचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेस सज्ज होत आहे. येथील तज्ज्ञ डॉक्टरांमोफत उपचारासह शस्त्रक्रियांची सेवा देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या हॉस्पिटलचे लोकार्पण व्हावे, यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत.

खासगी रुग्णालयातील उपचार गरिबांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे तुटपुंज्या पगारावर संसार चालवणाऱ्या कुटुंबाला सतत आजारपण, विविध तपासण्या, शस्त्रक्रियांचा खर्च कसा करायचा, याची सतत भीती असते. पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने रत्नागिरी नगरपरिषदेच्या रुग्णालयात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पूर्तता मुख्यमंत्र्यांकडून करून घेतल्या. मुंबईच्या साधना फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्टला येथे हॉस्पिटल सुरू करण्याची जबाबदारी दिली.

गणेशोत्सव काळात या हॉस्पिटलचे लोकार्पण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु अंतर्गत कामे पूर्ण होण्यास वेळ लागल्याने आता २ ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्याचे निश्चित झाले आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर आणि अभियंता यतिराज जाधव शिल्लक कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:10 PM 9/13/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow