भाजप महिला जिल्हाध्यक्षपदी वर्षा ढेकणे यांची नियुक्ती

Sep 16, 2024 - 11:14
 0
भाजप महिला जिल्हाध्यक्षपदी वर्षा ढेकणे यांची नियुक्ती

रत्नागिरी : भाजपच्या दक्षिण रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्षपदी वर्षा ढेकणे यांची नियुक्ती झाली. मावळत्या जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी यांची प्रदेश महिला मोर्चा कार्यकारणीच्या सदस्यपदी निवड झाल्याने हे पद रिक्त झाले होते.

नूतन महिला जिल्हाध्यक्षांनी शनिवारपासून राजापूर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासही सुरुवात केली. नूतन महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांच्या नियुक्तीनंतर लगेचच त्यांनी राजापूर मतदार संघात भेट दिली. या घडामोडींवरून भाजपनेही निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 16-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow