रत्नागिरी : जिल्ह्यातील पंधरा नद्यांमधील गाळाचा होणार उपसा

Sep 17, 2024 - 14:55
 0
रत्नागिरी : जिल्ह्यातील पंधरा नद्यांमधील गाळाचा होणार उपसा

चिपळूण : जिल्ह्यातील १५ नद्यांमधील सुमारे १५ लाख घनमीटर गाळ उपसा करण्यासाठी जलसंपदा विभाग आणि नाम फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. यामध्ये जलसंपदा विभागाकडे असलेल्या चिपळूण वाशिष्ठी नदीमधील लक्ष घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे.

चिपळूण वाशिष्ठी नदीसह संगमेश्वर तालुक्यातील उपनद्यांमधील गाळ उपसा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निकम यांनी पत्नी माजी सभापती पूजा निकम, सुपुत्र अनिरुद्ध निकम यांच्यासमवेत पुणे येथे जाऊन पाटेकर यांची निवासस्थानी सदिच्छा भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. त्या वेळी चिपळूणसह संगमेश्वरमधील उपनद्यांतील गाळ उपसा आणि संगमेश्वर तालुक्यातील कोंढूण गावच्या पुनर्वसनाबाबत चर्चा केली. या दोन्ही प्रश्नावर पाटेकर यांनी सहकार्य करू, असेही सांगितले. 

कोंढूण गावात यापूर्वी झालेल्या भूस्खलनाने तेथील घरांना धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ग्रामस्थांना दोन महिने घर सोडून अन्यत्र राहावे लागते. ओवळी-धनगरवाडीला आकले येथे घरे बांधून दिली गेली. तशाच पद्धतीने कोंढूण गावासाठी नाम फाउंडेशनने पुनर्वसन प्रकल्प राबवावा, अशी मागणी आमदार निकम यांनी पाटेकर यांच्याकडे केली. यावर नाम फाउंडेशन सकारात्मक पाऊल उचलेल, असे आश्वासन पाटेकर यांनी आमदार निकम यांना दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 17/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow