कोकणच्या निसर्गाचे दर्शन घडून देणारी विष्णू परीट यांची चित्रे

Sep 17, 2024 - 15:14
Sep 17, 2024 - 15:15
 0
कोकणच्या निसर्गाचे दर्शन घडून देणारी  विष्णू परीट यांची चित्रे

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथे वास्तव्याला असलेल्या चित्रकार विष्णू परीट यांना कोकणच्या निसर्गाने भुरळ घातली आहे. सोनवडे हायस्कूलमध्ये कलाशिक्षक असलेल्या परीट विष्णू परिट यांनी विद्यार्थ्यांना कलेचे धडे देत निसर्गाची विविध रूपे चितारली आहेत. कलाशिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर परीट यांच्या कुंचल्याने अधिक वेग घेतला आणि त्यांनी निसर्गाची शेकडो चित्रे चितारती आहेत. कामातील सातत्य हे चित्रकार परीट यांच्या यशाचे खरे गमक आहे.

सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या सह्याद्री कठा महाविद्यालयाची नुकतीच पावसाली सहल झाली. या सहलीमध्ये कला विद्याध्यांनी रेखाटलेल्या विविध चित्राकृतीचे प्रदर्शन चिपळूण येथे काणे सभागृहात झाले. या प्रदर्शनात चित्रकार परीट यांनी युवा कलाकारांसमोर जलरंगामध्ये निसर्गदृश्याचे अप्रतिम असे प्रात्यक्षिक सादर केले.

केवळ एका तासात त्यांनी सुंदर असे निसर्गदृश्य रेखाटून कला विद्यार्थ्यांना मार्गदर्शनदेखील केले. त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवलेल्या प्रात्यक्षिकाबद्दल ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, सह्यादी कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी विश्कार परीट यांच्याबद्दत कृतज्ञता व्यक्त केली घरीट यांनी चितारलेला कोकणचा निसर्ग चित्रांच्या माध्यमातून अनेक मान्यवरांच्या आणि कलारसिकांच्या संग्रही आहेत, राज्याच्या विविध कलादालनांना त्यांनी आपती कलाकृती भेट दिली आहे. प्रवाही आणि टवटवीत ताजे रंग हे परीट यांच्या चित्रांचे खास वैशिष्टा आहे. ते चित्रात रंग ओतताणा जीवही ओतत असल्यामुळे त्यांची चित्रे अधिक जिवंत होतात. पाणी कसे वाट काढत जाते त्या वेगाने परीट यांचे रंग चित्रात पसरत जातात. हिरव्या रंगाच्या अनेक जवळपासच्या छटा साकारत त्यांनी माळरानावर, डोंगरउतरावर दाखवलेले गवत तळपायाच्या मुलायम स्पर्शाला आसुसते भासते ग्रामीण जीवन, ग्रामीण भाग. शेतकरी, निसर्ग, समुद्रकिनारे हे त्यांच्या चित्रांचे मुख्य विषय आहेत, त्यांनी तयार केलेता गवताचा रंग, त्यांच्या रंगपेटीत तर नसतोच, पण रंगाच्या दुकानातही सापडणं कठीण आहे.

विदेशातही चित्रांना मागणी
हिरवा रंग निसर्गाच्या रंगपेटीतून परीट थेट यांच्या बोटात उतरतो. हे साकारण्यासाठी काही समर्पण असावी लागते आणि ते या अलविया कलाकारच्या रोमारोमात भरले आहे. रंगाचा तजेतदारपणा अखेरपर्यंत कायम राखण्यात त्यांना नेहमीच यश येते. टवटवीत रंग, चित्रात खोली निर्माण झाल्याचा कस आणि प्रत्येकाला आपलासा वाटेत असा विषय हे गुण त्यांच्या चित्रात नेहमी असतात, त्यांची चित्रे महाराष्ट्रासह विदेशातील चित्र संग्राहकांकडे आहेत त्यांना अनेक पारितोषिके प्राप्त झाली असून त्यांची असंख्य प्रदर्शन विविध ठिकाणं भरली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 17/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow