कोकणच्या नव्या महामार्गाची रुपरेषा जाहीर

Sep 17, 2024 - 15:59
 0
कोकणच्या नव्या महामार्गाची रुपरेषा जाहीर

ठाणे : मुंबईहुन गोव्याला के वळ सहा तासांमध्ये १५० पर कि. मी वेगाने धावू शकणारा कोकणच्या हायस्पीड ग्रीनफिल्ड महामार्गाची रुपरेषा राज्य रस्ते महाविकास मंडळाने जाहीर केली आहे. या महामार्गाची लांबी ३७६ कि.मी असून एकूण खर्च ६८,७२० कोटी येणार आहे. तसेच हा महामार्ग सहा पदरी करण्यात येणार असून, दोन सर्व्हिस रोड असणार आहे.

या महामार्गावर एकूण ४१ बोगदे ५१ मोठे ब्रिज आणि ओवरपास ६८ असणार आहेत. तीनही महामार्ग एकमेकाला जोडले जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्ग गेली १७ वर्ष रखडलेला तर सागरी महामार्ग ३० वर्षांपासून रखडला आहे. सागरी महामार्गावर रखडलेल्या आगरदांडा बाणकोट, रेवस आणि दाभोळ जयगड या पुलांची निविदा नव्याने काढण्यात आली आहे. या दोन महामार्गाची स्थीती अशी केवीलवाणी असताना आता कोकणवासियांना आणखी एका महामार्गाचे आमिष सरकारने दाखवले आहे. हा महामार्ग सर्वात जलद असेल आणि १२ तासावरुन प्रवासाची वेळ ६ तासावर येईल अशी घोषणा प्रकल्प अहवालात करण्यात आली आहे. 

मुंबई गोवा महामार्ग आणि सागरी महामार्ग याचे अंतर ४६० कि.मी आहे. मात्र हा नवा महामार्ग ३७६ कि.मी लांबीचा असल्याने ९० कि.मी अंतर कमी होणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेप्रमाणे हा महामार्ग अधिक सरळ असणार आहे. अटल सेतूवरुन अलिबाग-शहाबाज येथे पहिला टप्पा आहे. तेथून पुढे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत हा महामार्ग जाणार महामार्गाच्या मार्गिका ६ असून १०० मीटर रुंदीचा हा महामार्ग असेल. कोकणातील १७ तालुक्यातील या महामार्गाचा प्रवास होईल. मुंबई-गोवा महामार्ग आणि सागरी महामहार्ग या दोन महामार्गांच्या मधून जाणारा हा महामार्ग आहे. या महामार्गासाठी ३७९२ हेक्टर जमितनीचे संपादन केले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:27 PM 17/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow