राज्यात १६ लाख हेक्टरवरील पिके बाधित

Sep 17, 2024 - 16:06
 0
राज्यात १६ लाख हेक्टरवरील पिके बाधित

पुणे : राज्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांना पुन्हा एकदा तडाखा दिला. जवळपास १६ लाख १६ हजार ३४० हेक्टरवरील पिके बाधित झाली असून मराठवाड्यातील जिल्ह्यांत मोठे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद केले आहे. परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ जिल्ह्यातील खरीप पिके बाधित होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पीक नुकसानीमध्ये कापूस, सोयाबीय, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी, भात, मोसंबी, डाळिंब आणि कांदा व भाजीपाला पिकांचा समावेश आहे. तसेच, अतिवृष्टीमुळे ६७४ हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेलेली आहे. त्यात नांदेडमध्ये १९२, परभणी ७५, बुलडाणा ४८, वाशिम ५२ आणि यवतमाळ जिल्ह्यातील ३०७ हेक्टरचा समावेश आहे. २८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीतील हा नुकसानीचा अहवाल असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली. नुकसानीच्या पंचनाम्याची कामे महसूल आणि कृषी विभागाकडून एकत्रितपणे क्षेत्रीय स्तरावर सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बाधित क्षेत्राचा अहवाल
अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे शेती आणि फळपिकांचे जिल्हानिहाय झालेल्या बाधित क्षेत्राचा अहवाल हेक्टरमध्ये असा परभणी तीन लाख ४० हजार ४७५, नांदेड तीन लाख ३९ हजार १४७, हिंगोली दोन लाख ४९ हजार ८३९, जालना दोन लाख ११ हजार ७३१, छत्रपती संभाजीनगर दोन लाख सात हजार ७२०, यवतमाळ एक लाख ७१ हजार २९९ हेक्टरचा समावेश आहे. याशिवाय अकोला ४१ हजार ८८६, अहमदनगर जिल्ह्यात १५ हजार ६८४, बुलडाणा ११ हजार ५६१, वाशिम नऊ हजार ८८१, धाराशिव सहा हजार ६७, लातूर पाच हजार ७६८, चंद्रपूर चार हजार ४५५, अमरावती ५५७, वर्धा २६१, भंडारा सात हेक्टरवरील खरीप पिके बाधित झालेली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 17/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow