चिपळुणात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून २१ सप्टेंबरला जनसन्मान यात्रा

Sep 18, 2024 - 12:34
 0
चिपळुणात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून २१ सप्टेंबरला जनसन्मान यात्रा

चिपळूण : महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) विधानसभेची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २१ सप्टेंबरला राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जनसन्मान यात्रा काढण्यात येणार आहे.

लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कंबर कसली असून, त्याचाच एक भाग म्हणून जनसन्मान यात्रा काढली जात आहे. राज्यभरात ८ ऑगस्टपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ अशा ३९ विधानसभा मतदारसंघांत पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधत आहेत. पवारांच्या ३५ वर्षांच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी जनतेच्या हिताला प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली "जनसन्मान यात्रा" काढली जात असून, ती संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांपर्यंत घेऊन जाणार आहेत. शनिवारी चिपळुणात यात्रा काढली जाणार आहे. शहरातील बहादूरशेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात होईल. याबाबत आमदार शेखर निकम, जयंद्रथ खताते, रमेश राणे, आदींसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 18/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow