नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी

Sep 18, 2024 - 10:35
Sep 18, 2024 - 15:35
 0
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात कुर्ला येथे झाला असून या अपघातात समीर खान गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांची मुलगी आणि जावई रुग्णालयात नियमित तपासणी करून परतत होते. ते कारमध्ये बसले असताना कार चालकाने चुकून ॲक्सिलेटर दाबल्याने कार भिंतीवर आदळली. समीर खान यांच्या डोक्याला दुखापत झाली असून ते सध्या आयसीयूमध्ये आहेत.

“दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार”; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा

या अपघातात नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांनाही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात मुंबईतील कुर्ला येथे झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 18-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow