'...तर सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे मुख्यमंत्रि‍पदाच्या दावेदार असू शकतात' : काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड

Sep 18, 2024 - 11:03
Sep 18, 2024 - 15:34
 0
'...तर सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे मुख्यमंत्रि‍पदाच्या दावेदार असू शकतात' : काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होऊन आणि यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलष आणून जवळपास 64 वर्षे उलटली आहेत. मात्र, अद्याप महाराष्ट्राला एकदाही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही. विधानसभा निवडणुका 2 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना 'महिला मुख्यमंत्री' हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळू शकते का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. त्यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलंय. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली तर मला फारच आनंद होईल. महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगत आहे. आता 50 टक्के आरक्षण आपण लागू केलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचं आघाडीवर आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रीपदासाठी महिलांचे चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आहेत. आमच्या काँग्रेस पक्षात सुद्धा महिला आहेत. शेवटी याबाबतचा निर्णय निवडून आलेली आमदार मंडळी ठरवत असतात.

महायुतीमध्ये जागा वाटप स्ट्राईक रेटवरच ठरणार, शिंदे-फडणवीसांचं वक्तव्य

महायुतीमध्ये जागावाटप स्ट्राईक रेटनुसार होणार यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकत्र उत्तर दिले आहे. गणपती बाप्पा आमचा स्ट्राईक रेट वरच ठेवेल असं फडणवीस म्हणाले. तर गणपती बाप्पा सर्वांना सद्बुद्धी देवो, सुबुद्धी देवो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय

विधानसभा निवडणूक कधी होणार ?

2024 हे वर्ष उजाडलं तेव्हापासूनच राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका केव्हा होतील ही चर्चा सुरू आहे. सुरुवातीला विधानसभा निवडणुका लोकसभेत सोबतच होतील अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होईल अशी चर्चा सुरू झाली. मात्र, विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात होईल आणि तीही एका टप्प्यात नसून दोन टप्प्यात होईल, अशी बातमी एबीपी माझाने दिली होती. राज्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होतील, अशी माहिती देत मुख्यमंत्र्यांनीच शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, राज्यात नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेण्यासंदर्भात काही प्रशासकीय, काही राजकीय तर काही सुरक्षा विषयक कारणं असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 18-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow