खेड : बहिरवली मोहल्ल्यातील घरातून भांड्यांची चोरी

Sep 19, 2024 - 11:30
 0
खेड : बहिरवली मोहल्ल्यातील घरातून भांड्यांची चोरी

खेड : तालुक्यातील बहिरवली मोहल्ल्यातील एका घराचा दरवाजा उघडा असल्याचा गैरफायदा घेऊन दि. १३ रोजी सकाळी १० ते दि. १५ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या मुदतीत अज्ञात चोरट्याने घरातील ९ हजार ६०० रुपये किमतीची भांडी चोरली आहेत. इकबाल हुसैन अली चौगुले (६९) यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

तालुक्यातील बहिरवली मोहल्ल्यातील येथील इकबाल हुसैन अली चौगुले व त्यांची पत्नी चिपळूण येथे राहायला गेले होते. त्यावेळी त्यांची आई मूळ गावी बहिरवली येथे राहत असल्याने तिच्या जेवणासाठी त्यांनी शेजारी राहणार्या रेशमा अफसर मलीक यांच्याकडे सोय केली होती. त्यादरम्यान त्यांची आई घराचा दरवाजा उघडा ठेवत होती. तसेच त्यांची वयोवृद्ध आई एकटी असल्याने व तिला कमी दिसत असल्याचा गैरफायदा अज्ञात चोरट्याने घेऊन बेडरूममधील माळ्यावर ठेवलेल्या दोन गोणीतील १ हजार ५०० रुपये किंमतीचा एक गोलाकार तांब्याचा हंडा, ८०० रुपये किमतीची एक तांब्याची गोल परात, १ हजार रुपये किमतीची तांब्याची पाच जेवणाची ताटे, एक हजार रुपये किंमतीचा एक तांब्याचा किटली सेट, चार हजार रूपये किमतीचे पाच तांब्याचे लहान-मोठे टोप व एक हजार रुपये किमतीची एक तांब्याची शिकारी व पाण्याचा लोटा अशी एकूण ९ हजार ३०० रुपये किंमतीची भांडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 19-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow