चिपळुण : पुतळा परिसरात आंदोलनांना चाप

Sep 19, 2024 - 11:30
 0
चिपळुण :  पुतळा परिसरात आंदोलनांना चाप

चिपळूण : शहरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व बहादूरशेख नाका येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्याची नवी प्रथा सुरू होताना दिसत आहे. जनतेने प्रेरणा घ्यावी यासाठी उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळा परिसरातील चुकीच्या पायंड्याची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली असून, यापुढे पुतळा परिसरात आंदोलन करता येणार नाही, असा ठराव प्रशासन करणार आहे. यानंतरही आंदोलन केल्यास गुन्हे दाखल करण्याबाबतचे पत्रही पोलिसांना दिले जाणार आहे.

अलीकडे महापुरुषांपासून प्रेरणा घेण्याऐवजी आपल्या राजकीय हेतूसाठी त्यांच्या पुतळ्यांसमोर आंदोलन करण्याची नवी प्रथा काही राजकारणी आणताना दिसत आहे. प्रशासनाने याची दखल घेत पुतळ्यांच्या ठिकाणी आंदोलन करता येणार नाही, असा ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow