रत्नागिरी : जिल्ह्यातील डी. एड., बी. एड. बेरोजगारांची जिल्हा परिषदेवर धडक

Sep 19, 2024 - 11:41
Sep 19, 2024 - 11:48
 0
रत्नागिरी : जिल्ह्यातील डी. एड., बी. एड.  बेरोजगारांची  जिल्हा परिषदेवर धडक

रत्नागिरी : शासनाने ५ सप्टेंबर रोजी काढलेल्या कंत्राटी शिक्षक घेण्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी त्वरित करावी, यासाठी गुरुवारी, बुधवारी जिल्ह्यातील डी.एड., बी.एड., बेरोजगार जिल्हा परिषदेवर थडकले होते. त्यांच्या मदतीला आमदार राजन साळवी धावून आले. यामुळे जि. प. प्रशासनाने सावध भूमिका घेत लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले.

शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेवर २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड., बी.एड. झालेल्या बेरोजगारांना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणुका देण्याचा निर्णय ५ सप्टेंबर रोजी घेतला. त्यानुसार अध्यादेशही काढला गेला. कंत्राटी तत्त्वावर नेमणूक मिळाल्यानंतर संबंधित शिक्षकाला शासनाकडून महिन्याला १५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. वर्षाला १२ रजा असणार असतील. मात्र, प्रशासकीय अधिकार नसतील.

इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवावेत, असे शासनाच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे. जिल्हास्तरीय समितीकडून याची पडताळणी करून या उमेदवारांना त्वरित नियुक्ती द्याव्यात, असेही म्हटले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी. या मागणीसाठी जिल्ह्यातील डी.एड., बी.एड. बेरोजगार एकवटले आहेत. या कार्यवाहीमध्ये दिरंगाई होत असल्यामुळे बुधवारी त्यांनी जिल्हा परिषदेवर धडक मारली. सुमारे १०० बेरोजगार जिल्हा परिषदेवर येऊन धडकले.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजन साळवी तसेच प्राथमिक शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर हे होते. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्वरित नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी डी.एड., बी.एड. बेरोजगार ठाण मांडून बसले दिले.

यावेळी राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनानेसुद्धा सावध भूमिका घेत शासन निर्णयानुसारच ही प्रक्रिया सुरू आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत या शिक्षकांना नियुक्त्या दिल्या जातील, असे आश्वासन दिले.

शासनाच्या या निर्णयाची
अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे. इतर जिल्ह्यात प्रक्रिया सुरूदेखील झाली आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप काहीच झालेले नाही. प्रशासनाने दिरंगाई केली तर याबाबत आंदोलन करण्यात येणार आहे.

स्थानिक डी.एड., बी.एड. बेरोजगारांना जि.प. प्रशासनाने लवकरात लवकर नियुक्ती द्यावी, ही आमची भूमिका आहे. त्यांच्या पाठी आम्ही ठामपणे उभे आहोत. वेळ पडली तर आंदोलनही करू. आमदार राजन साळवी

शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. ३० सप्टेंबरच्या कमी जास्त पत्रक झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतरच जिल्ह्यात नेमक्या किती जागा रिक्त आहेत, हे समजणार आहे. - बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग जि. प. - सुदर्शन मोहिते, अध्यक्ष, जिल्हा बेरोजगार संघटना, रत्नागिरी
होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow