अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक

Sep 19, 2024 - 11:25
Sep 19, 2024 - 12:06
 0
अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक

मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात सेकंड क्रॉस लेनमध्ये दोन बंगल्यांना भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन्ही बंगले आगीत जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील बंगला क्रमांक ११ मध्ये आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेल्याचं सांगण्यात येत आहे. बंगल्यात कुणीही राहात नव्हतं त्यामुळे जीवितहानीचा धोका टळल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. घटनास्थळावर अग्निशमन दलासोबतच रुग्णवाहिका, अदानी इलेक्ट्रिक, महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 19-09-2024

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow