मंडणगड नगर पंचायतीविरोधात ठिय्या आंदोलन

Sep 19, 2024 - 12:08
 0
मंडणगड नगर पंचायतीविरोधात ठिय्या आंदोलन

मंडणगड : मंडणगड नगर पंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे सत्ताधारी व प्रशासन यांचे लक्ष वेधले जावे याकरिता नगर पंचायत विरोधी पक्ष गटनेते विनोद जाधव, नगरसेवक आदेश मर्चडे, योगेश जाधव, नीलेश सापटे, वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, सेजल गोवळे स्वीकृत नगरसेवक नरेश बैंकर यांनी शहर विकास आघाडीचे माध्यमातून १८ सप्टेंबर २०२४ रोजी मंडणगड शहरातून प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून मुख्याधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

अनेक महिने नादुरुस्त असणारी स्मशानशेड अद्यापही नादुरुस्त असल्याने याबरोबर पथदिव्यांचे पोल बसूनही मीटर घेण्यासाठी आवश्यक ठराव होऊनही सत्ताधाऱ्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत असल्याने याचबरोबर गेली अनेक वर्षे नगर पंचायतीला खड्डे भरण्यात आलेले अपयश या तीन प्रमुख मुद्द्यांसह इत्यादी अनेक कारणांसाठी सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यात सत्ताधाऱ्यांचे करायचे काय खालती डोके वरती पाय, शहरवासीयांची पाण्यासाठी वणवण सत्तेसाठी कायपण इत्यादी निषेधात्मक घोषणा देत नगरसेवकांनी परिसर दणाणून सोडला व आपले आंदोलन सुरू केले व सुमारे नगरपंचायत मुख्याधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चार तासांहून अधिक काळ आंदोलन सुरु होते. मुख्याधिकारी अभिजित कुंभार, प्रशासकीय अधिकारी अभिजित राणे, कर्मचारी मनोज मर्चेंडे, विकास साळवी आर्दीनी या आंदोलनाची दखल घेतली व आंदोलक नगरसेवकांशी चर्चा केली. या नंतर महत्त्वाच्या ऑनलाईन व्हीसीकरिता मुख्याधिकारी निघून गेले त्यामुळे आंदोलन सुरु राहिले.
 
कार्यालयीन कामे आटोपल्यावर मुख्याधिकारी अभिजित कुंभार व नगरपंचायतीचे संबंधित विभागातील कर्मचारी पुन्हा चर्चेसाठी आले व आपल्या मागण्या या जनतेच्या मागण्या असल्याने नमूद प्रश्नातील समस्या मार्गी लावणे प्रशासनाचे अग्रक्रमाचे काम असल्याने त्या सोडवण्यासाठी प्रशासन कटिबध्द असल्याचे म्हणणे नमूद केले. यानंतर विरोधी नगरसेवकांनी आपण जी कार्यवाही करणार आहोत, तिचे लेखी पत्रातून आश्वासन द्या नंतरच आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका घेतली व लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, लेखी आश्वासनावर नमूद वेळेत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार असल्याचे नगरसेवक विरोधी गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow