चिपळूण नगर परिषदेत 'स्वच्छता ही सेवा' मोहीमेचा शुभारंभ

Sep 19, 2024 - 11:59
 0
चिपळूण नगर परिषदेत 'स्वच्छता ही सेवा' मोहीमेचा शुभारंभ

चिपळूण : चिपळूण नगर परिषद अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहीम दि. १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रमनिहाय राबविण्यात येणार आहेत. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ साठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सफाई मित्र यांना शासनाच्या विविध योजनां लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उप-कार्यकारी अभियंता श्री. पाटणकर तसेच युनियन बँकेचे शाखा प्रबंधक हितेश गजबीये, आयुष्यमान भारतच्या दर्शना मोरे, प्रधानमंत्री आवास योजनेचे सूरज चिपळूणकर, उज्ज्वला गॅस योजनेची माहिती देण्यासाठी प्रशांत सांगळे, अक्षय बुरबाडकर तसेच न.प.चे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर, कार्यालय अधीक्षक अनंत मोरे, रचना सहाय्यक नम्रता खैरमोडे आदी उपस्थित होते. सदर विविध योजनांची माहिती दिल्यानंतर मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याहस्ते आयुष्यमान भारत योजनेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सफाई मित्र प्रतिनिधी म्हणून प्रदीप जाधव यांना सन्मानित करण्यात आले.

दि. १८ रोजी नगर परिषद नागरी आरोग्य केंद्रामध्ये सफाई मित्र सुरक्षा शिबिर घेण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी आरोग्य समुपदेशन केले. तसेच डॉ. पूजा बेडेकर (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. स्वरूपा गरुड (त्वचारोग तज्ञ), डॉ. विनायक पाटील (वैद्यकीय अधिकारी) डॉ. गणेश कांबळे (वैद्यकीय अधिकारी) मनोहर तायडे महेश खांबगाल उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये डॉ. पूजा बेडेकर (खी- रोगतज्ञ) यांनी समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई मित्रांच्या आरोग्याची तपासणी व त्यांना वैद्यकीय लाभ देणेची संधी मिळाली त्याबद्दल नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow