मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करताच वृद्धाच्या खात्यातून ९६ हजार ८०० रुपये उडाले..

Sep 20, 2024 - 10:48
 0
मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करताच वृद्धाच्या खात्यातून ९६ हजार ८०० रुपये उडाले..

रत्नागिरी : बीएसएनएल कंपनीच्या मोबाईल नंबरवर आलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यावेळी बॅंक खात्यातून ९६ हजार ८०० रुपये काढल्याचा मॅसेज आला असल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना ४ ते ९ सप्टेंबर सायंकाळी पाच च्या सुमारास चैत्रबन अभ्युदयनगर नाचणेरोड, रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भास्कर गोपाळ गाडगीळ (वय ६८, रा. अभ्युदयनगर, नाचणेरोड, रत्नागिरी) हे घरी असताना त्यांच्या बीएसएनएल कंपनीचा नंबर असलेल्या मोबाईलवर अज्ञाताने लिंक आली होती. फिर्यादी यांनी ती लिंक क्लिक केली असता ६ सप्टेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी गाडगीळ यांच्या स्टेंट बॅंक खात्यातून ९६ हजार ८०० रुपये काढल्याचा त्यांच्या मोबाईलवर मॅसेज आला. फसवणूक झाल्याने भास्कर गाडगीळ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 20-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow