मंडणगड : 'कुणबी भवनच्या राजा'ला मिरवणुकीने निरोप

Sep 19, 2024 - 12:46
 0
मंडणगड : 'कुणबी भवनच्या  राजा'ला मिरवणुकीने निरोप

मंडणगड : तालुका कुणबी सेवा संथाव्याक्तीने शहरातील कुणबी भवन येथे बसवण्यात आलेल्या कुणबी भवनच्या राजाचे विसर्जन तालुक्यातून काढण्यात आलेल्या २९ किमी लांब मिरवणुकीने करण्यात आले. या वेळी गावोगावी बाप्पाचे स्वागत करण्यात आले. मंडळाच्या गणेशोत्सवाचे हे ३९वे वर्ष होते.

मंडणगड तालुक्यात अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणूक मोठया उत्साहात काम्यात आली. ही मिरवणूक मंडणगड शहरातून तुळशी, पाले, पावरळ, कोन्हवली, देव्हारे, नायणे व चिंचघर या मागनि काढली गेली. त्यामध्ये मोठ्या संख्येने कुणबी समाजबांधव सहभागी झाले होते. कुणबी सेवासंघाचे अध्यक्ष दिनेश साखरे, मुंबई अध्यक्ष मनोज घागरूम, महिला आघाडी अध्यक्षा समिधा सापटे, माजी सभापती भाई पोस्टुरे, रमेश घडवले, रघुनाथ पोस्टुरे, प्रकाश शिगवण, विजय ऐनेकर, सचिन माळी, सुरेश पोस्टुरे, जितेंद्र साळवी, अॅड. ज्ञानेश्वर मोरे, मारुती घालणकर, रामचंद्र पारी, सहदेव माळी, प्रकाश साळवी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करून कुणबी भवन येथील प्रांगणातून शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरवात झाली, बाप्पाच्या निरोपाच्य घोषणांनी परिसर दुमदुमला होता. संध्याकाळी साडेपाच वाजता भारजा नदीपात्रात मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या वेळी चिंचघर पुलावर भाविकांनी प्रचंड गर्दी केली. मंडणगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन गवारे, बाणकोट सागरी पोलिस खाण्याने पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्य मार्गदर्शनाखाली दहा दिवसांपासून सुरु असलेला गणेशोत्सव शांततेत व्यव याकरिता चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रहदारीच्या ठिकाणं वाहतुकीचेही नियोजन केले होते.
 
विविध खेळांचे प्रात्यक्षिक
कुणबी भवनच्या राजाच्या मिरवणुकीला आगळेवेगळे महत्त्व आहे. पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात येते. तुळाशी गावामध्ये स्थानिक कलाकारांनी विविध खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यामध्ये महिलांचा समावेश होता, तर देव्हारे येथे बाजारपेठ परिसरात नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आले. ते पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:14 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow