निर्माल्यावर प्रक्रियेतून खतनिर्मिती; चिपळूण पालिकेचा उपक्रम

Sep 20, 2024 - 11:04
Sep 20, 2024 - 11:08
 0
निर्माल्यावर प्रक्रियेतून खतनिर्मिती; चिपळूण पालिकेचा उपक्रम

चिपळूण : वाशिष्ठी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी हाती घेतलेल्या निर्माल्यदान चळवळीला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. गौरी- गणपती विसर्जनावेळी सुमारे १६०० टन निर्माल्य जमा झाले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत निर्माल्यावर नैसर्गिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यापासून सुमारे साडेतीन टन सेंद्रिय खत तयार झाले आहे.

चिपळुणात दरवर्षी निर्माल्यदान उपक्रम राबवला जातो. गौरी-गणपती विसर्जनावेळी नदी प्रदूषण टाळण्याचे आवाहन पालिकेने केले होते. पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या प्रसंगी दरवर्षीप्रमाणे यंदाही निर्माल्यदान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. निर्माल्य विसर्जनामुळे होणारे नदी व अन्य पाणवठ्यांच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने शहरात २२ ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती. शहरातील नागरिकांनी व गणेशभक्तांनी स्वंयस्फूर्तीने या उपक्रमात सहभाग घेतला होता. गणेशभक्तांनी तलावात मूर्तींचे विसर्जन केले; मात्र निर्माल्य पालिकेच्या कलशात दान केले. या निर्माल्यावर शिवाजीनगर येथील पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये प्रक्रिया सुरू आहे. प्रथमतः निर्माल्याचे वर्गीकरण केल्यानंतर त्याचे बेड तयार केले जाते. बेडवर बायोक्लिन पावडर टाकून नैसर्गिकरित्या खत तयार केले जाते. मागील पाच वर्षापासून नैसर्गिकरित्या खत तयार करण्याचे काम सुरू आहे. शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पातून यापूर्वी गांडूळखत तयार केले जात होते; मात्र आता नैसर्गिक खत तयार केले जात आहे. तयार झालेल्या खताचा वापर शहरातील पालिकेच्या बागांमध्ये केला जातो. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याची विक्री करण्यात येणार आहे. परिणामी, निर्माल्यदान उपक्रमांतून सेंद्रिय खतनिर्मितीला चांगली चालना मिळू लागली आहे.

नदी, तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी निर्मात्य दान करूया... हा उपक्रम पालिकेकडून सुरू झाला. शहरातील गणेशभक्तांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे नदीचे प्रदूषण कमी करण्यात पालिकेला यश आले. निर्मात्यातून आतापर्यंत साडेतीन टन खतनिर्मिती झाली आहे. अजून खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. महेश जाधव, आरोग्य निरीक्षक, चिपळूण पालिका

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow