रास्त धान्य दुकानदार कमिशनपासून अद्याप वंचित

Sep 20, 2024 - 11:11
 0
रास्त धान्य दुकानदार कमिशनपासून अद्याप वंचित

चिपळूण : रास्त धान्य दुकानदारांचे थकित कमिशन तत्काळ देण्याचे पुरवठा विभागाने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही. त्यामुळे २३ सप्टेंबरला पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्यात येणार आहे. सध्या सणावेळीच लाभार्थ्यांची गैरसोय नको म्हणून धान्य वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिली.

कदम म्हणाले, जिल्हा पुरवठा विभागाने फेब्रुवारी. मार्च, जून, जुलै व ऑगस्ट या पाच महिन्याचे प्रतिक्विंटल १५० प्रमाणे मिळणारे कमिशन दुकानदारांना अद्याप दिलेले नाही तसेच अनेक मागण्याही शासनस्तरावर प्रलंबित आहेत. यामुळे दुकानदार अडचणीत आले असून, पैशाअभावी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता आला नाही. या सणावेळी कमिशन न दिल्यास धान्य वितरण बंद ठेवण्याचा संघटनेने इशारा दिल्यानंतर पुरवठा विभागाच्या जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी काही महिन्यांचे तरी कमिशन गणशोत्सवापूर्वी देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र, या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. तरीही सणावेळी लाभार्थ्यांची गैरसोय नको म्हणून आम्ही धान्य वितरण सुरू ठेवले आहे; मात्र २३ला पालकमंत्री सामंत यांची भेट घेऊन आम्ही आमच्या व्यथा त्यांना सांगणार आहोत; मात्र शासनाने लक्ष दिले नाही तर नजीकच्या काळात सर्व दुकानदार आंदोलन करतील, असा इशाराही जिल्हाध्यक्ष कदम यांनी दिला आहे.

वितरक अडचणीत
कमिशन न मिळाल्याने रेशन दुकानदार अडचणीत आले असून, पैशाअभावी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता आला नाही. या सणावेळी कमिशन न दिल्यास धान्य वितरण बंद ठेवण्याचा संघटनेने इशारा दिल्यानंतर पुरवठा विभागाच्या जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी काही महिन्यांचे तरी कमिशन गणशोत्सवापूर्वी देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र, या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow