खेडमध्ये प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीची मोहीम थंडावली

Sep 20, 2024 - 14:22
 0
खेडमध्ये प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीची मोहीम थंडावली

खेड : शहरात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर सुरू आहे. ४ महिन्यांपूर्वी नगरप्रशासनाने उघडलेली कारवाईची मोहीम पुरती थंडावल्याने व्यावसायिकांचे फावत आहे. एकीकडे माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छतेचा जागर सुरू असताना दुसरीकडे मात्र प्लास्टिक बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. नगरप्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील व्यावसायिकांकडून प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे.

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरांस शासनाने बंदी घातली आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. त्यानुसार नगरप्रशासनाकडून पिशव्यांचा दंडात्मक वापर प्लास्टिक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारण्यात येत आहे. मात्र नगरप्रशासनाची दंडात्मक कारवाईची मोहीम थंडावल्याने पुन्हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. ऐन गणेशोत्सवातही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर सुरू असतानाही नगरप्रशासनाच्या निदर्शनास ही बाब येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईसाठी नगरप्रशासनाला सवड मिळणार तरी कधी, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी यात लक्ष घालावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow