''किरण सामंत यांना वगळून नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट, राणे बंधूंनी सांभाळून बोलावं, अन्यथा...''

Jun 7, 2024 - 14:23
Jun 7, 2024 - 14:23
 0
''किरण सामंत यांना वगळून नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट, राणे बंधूंनी सांभाळून बोलावं, अन्यथा...''

मुंबई : आम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आहोत, राणे कुणालाच माफ करत नाहीत, असं म्हणत भाजपचे निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे.

निवडणुकीच्या काळात किरण सामंत हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना भेटल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा आमच्याकडे यावेत, अशी मी मागणी देखील निलेश राणेंनी केली आहे. निलेश राणेंच्या या विधानावरुन महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटातील नेते देखील निलेश राणेंच्या वक्तव्यावरुन आक्रमक होताना दिसत आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या चर्चा आमच्या कानावर आल्या. त्यांच्या चर्चा पुर्ण चुकीच्या आहेत, असं भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले.

भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?

नारायण राणेंना तिकीट मिळता-मिळता अनेक अडचणी होत्या. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत घातल्याने त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले. नारायण राणेंना मिळालेली 74 हजार मते ही आमची आहेत. किरण सामंत यांना तिकिट वगळून आम्ही नारायण राणेंना दिली. त्यामुळे दोन्ही राणे बंधूंनी बोलताना सांभाळून बोलावे, अन्यथा पुढच्या पदवीधर निवडणुकीच्याबाबतीत आम्ही योग्य तो विचार करु, असा इशारा देखील भरत गोगावले यांनी दिला.

हे विचार राणे बंधूंनी डोक्यातून काढून टाकावे- भरत गोगावले

आमच्यासुद्धा काही जागा पडल्या, तिथे आम्ही दावा करत बसलो नाही. मात्र जे झालं ते आम्ही मान्य करतो. आम्हालाही याची कल्पना आहे. संविधान बदलेल या भीतीने मुस्लीम , बहुजन समाजाने ज्या भागात मोदींना मतदान नाकारलं, याचा फटका निश्चित बसला. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही पूर्वीचा पारंपारिक मतदार संघ आता ताब्यात घेऊ. हे विचार राणे बंधूंनी डोक्यातून काढून टाकावे, अन्यथा आम्ही देखील पुढचा विचार करू, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला.

उदय सामंत लीड देऊ शकले नाही- निलेश राणे

उदय सामंत पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत. उदय सामंत या बाबत बोलतील ते का लीड देऊ शकले नाहीत. आम्ही रत्नागिरीमधून अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत.

उदय सामंत काय म्हणाले?

मतदारसंघ कुणाला सोडायचा, कोण उमेदवार असेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपमधून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार ठरवतात. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. निर्णय नेतेमंडळी घेत असतात. मी महायुतीतला एक जबाबदार मंत्री आहे, त्यामुळे मला यातून वाद वाढवायचा नाही. त्यांच्या मताचा मी आदर करतो, असं म्हणत उदय सामंत यांनी निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं. तसेच मी प्रामाणिकपणे काम करतो. त्यामुळे मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, असंही उदय सामंत म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 07-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow