संगमेश्वर : धामापूर मार्गावरील कोसळलेले झाड ग्रामस्थांनी हटवले

Jul 27, 2024 - 10:45
 0
संगमेश्वर : धामापूर मार्गावरील कोसळलेले झाड ग्रामस्थांनी हटवले

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन करजुवे या मुख्य रहदारीच्या मार्गावरच धामापूर येथे गोवळ वाडी, निमरीजवळ पडलेले भलेमोठे झाड सामाजिक कार्यकर्ते सुशील भायजे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाजूला करून रहदारीसाठीचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. 

घटनेदिवशी सकाळची शाळा, त्यातच माखजनचा आठवडा बाजार यामुळे प्रवासी वर्गासह वाहनांची सततची ये जा असते. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे शनिवारी पहाटे अचानक या मार्गावर भले मोठे झाड आडवे पडले. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना माखजन किंवा करजुवे शाळेकडे येण्याचा मार्ग बंद झाला. एसटी वाहतूक खोळंबली, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे विद्यार्थी शाळे पासून वंचित राहतील अशी स्थिती होती. मात्र, सामाजिक कार्यकर्ते सुशील भायजे यांनी पहाटेच या ठिकाणी येऊन मार्गावर पडलेले झाड ग्रामस्थांच्या मदतीने बाजूला केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 27-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow