खेडमधील पोसरे खुर्द बौद्धवाडी दरडग्रस्तांना हक्काच्या घराची प्रतीक्षा

Jun 8, 2024 - 15:20
Jun 8, 2024 - 15:25
 0
खेडमधील पोसरे खुर्द बौद्धवाडी दरडग्रस्तांना हक्काच्या घराची प्रतीक्षा

खेड : तालुक्यातील पोसरे खुर्द बौद्धवाडी येथे सन २०२१ मध्ये ७ घरांवर दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेस ३ वर्षांचा कालावधी लोटला तरीदेखील प्रशासनाने अजूनही त्यांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर उपलब्ध करून दिलेले नाही. सरकारी पुनर्वसनाचे आश्वासन हवेतच विसरले, असे दिसत असले तरी खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाने त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मात्र, प्रशासन कागदी घोडे  रंगवण्यातच दंग आल्याने या वर्षदिखील पोसरे दुर्घटनेत पर गमावून  विस्थापित व्हाच्या लागलेल्या कुटुंबांना हक्काच्या छप्पाराविना पावसाळा काढावा लागणार आहे.

दि. २२ जुलै २०२९ रोजी तालुक्यात अतिवृष्टी काळात पोसरे बौद्धवाडीवर दरड कोसळली. त्या रात्री डोंगराचा भाग बौद्धवाडीतील घरांवर कोसळल्याने ७ घरे दरडीखाली गाडली गेली होती. या दुर्घटनेत तब्बल १७ जणांना प्राण गमवावा लागला होता. का दुर्घटनेनंतर दरडग्रस्त ग्रामस्थांचे तातडीने पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजूनही दरडग्रस्त पुनर्वसनाच्या प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यांच्या हक्काची घरे उपलब्ध  झालेली नाहीत. सुरवातीला प्रशासनाने पुनर्वसन करू असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर प्रशासनाने तुम्ही जमीन द्या आम्ही घरे बांधून देतो असे सांगत दरडग्रस्थांची अवहेलना सुरू केली. आपत्तीग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी तालुका बौद्ध सेवा संघाचे पदाधिकारी पुढे सरसावले होते.
     
तालुका बौद्ध समाज सेवा संघाने प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करूनदेखील अधिकारी वेळकाढूपणा करत आहेत. केवळ पुनर्वसनाचे आश्वासन  मानली होती. देण्यातच प्रशासनाने धन्वता मानली होती. यानंतर दरडग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुका बौद्ध समाज सेवा संघाने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाविरोधात दंड धोपटण्यास सुरुवात केली. यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करल्यानंतर प्रशासनाने दरडग्रस्तांचे  पुनर्वसनासाठी जागेचा शोध घेण्यास सुरुवात करत असगणी येथे जागेची निश्चिती केली होती. यानंतर ग्रामस्थांनी घरांसाठी प्रशासनाचे उंबरठे विजयूनदेखील अजूनही त्यांना हक्काची घरे प्राप्त झालेली नाहीत.
दि. २२ जुलै २०२४ रोजी या दुर्घटनेस ३ वर्षाचा कालावधी पूर्ण होणार आहे. मात्र अजूनही प्रशासनाकडून दरडग्रस्त ग्रामस्थांची चेष्टाच केली गेली आहे.

घरे उपलब्ध करून न दिल्यास उग्र आंदोलन छेडू: तांबे
पोसरे-बौद्धवाडी दरडग्रस्त ग्रामस्थांना अद्याप ना पुनर्वसन ना घरे देण्यात आलेली नाही ही अंत्यत खेदजनक बाब किंबहुना त्यांची क्रूर चेष्टा केली गेली. प्रशासनाने हि बाब गंभीरपणे घेऊन दरडग्रस्त ग्रामस्थांना तांच्या हक्काची घरे उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खेड बौद्ध समाज सेवा संघाचे विदमान अध्यक्ष राजरत्न तांबे यांनी दिला आहे.   

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 08/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow