‘नीट’ची परीक्षा तरी नीट घ्या, केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल : अमित ठाकरे

Jun 11, 2024 - 17:12
Jun 11, 2024 - 17:26
 0
‘नीट’ची परीक्षा तरी नीट घ्या, केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल : अमित ठाकरे

मुंबई : नीट परीक्षेच्या गोंधळाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी यासंदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. अन्यथा या प्रश्नी मनसे रस्त्य्यावर उतरेल असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला आहे. त्याचवेळी नीटची परीक्षा तरी नीट घ्या, अशी तिरकस प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हरियाणातील काही विद्यार्थ्यांना ‘नीट’ या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात? ६७ मुलांना पैकीच्या पैकी गुण? हे काय चालले आहे? 'नीट' ही परीक्षा आता खाजगी क्लासेस आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या दलालांच्या ताब्यात गेली आहे का? असा सवाल अमित ठाकरे यांनी विचारला आहे. परीक्षेत गडबड, विद्यार्थी-पालकांमध्ये अविश्वास, डॉक्टर बनण्याची इच्छा बाळगणारे विद्यार्थी आणि पालक यांच्यात तीव्र संताप, आंदोलने... हे चित्र निश्चितच दुर्दैवी आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आंदोलने सुरू आहेत, हे बरे नसल्याचे अमित ठाकरे म्हणाले.
 

पेपरफुटीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास अजूनही यंत्रणा अपयशी का? पारदर्शकतेचा अभाव दिसून येतोय. 'नीट' परीक्षा केवळ डॉक्टर बनण्याचा मार्ग नाही तर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि भविष्याचा आधार आहे. या परीक्षेतील गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मनोबल खचले आहे आणि त्यांच्या आकांक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे सांगून नीटची परीक्षा तरी नीट घ्या, अशी तिरकस प्रतिक्रिया देऊन अमित ठाकरे यांनी केंद्र सरकारला याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow