राजापूर : महामार्ग चौपदरीकरणातील कामे अद्याप अपुर्णच

Jun 12, 2024 - 13:48
 0
राजापूर : महामार्ग चौपदरीकरणातील कामे अद्याप अपुर्णच

राजापूर : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात राजापूरातील कामे अद्यापही अपुर्णच आहेत. पेट्रोलपंपानजीकच्या पुलावरिल रस्त्याचे कामाबरोबरच एसटीडेपो समोरील बंगलवाडीकडे जाणारा जोडरस्ता, बावकर हॉस्पीटलकडील जोडरस्ता ही कामे अद्याप पुर्ण झालेली नाहीत. याबाबत वारंवार तक्रारी करून व प्रत्यक्ष पहाणी करूनही महामार्ग व ठेकेदाराकडून त्यांची पुर्तता झालेली नाही. त्यामुळे यावर्षीही पावसाळयात जर का या अपुर्ण कामांमुळे अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असा खडा सवाल राजापूरचे माजी नगराध्यक्ष अॅड. जमिर खलिफे यांनी केला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे व अपुर्ण कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना संबधितांना द्याव्यात अशी मागणी अॅड. खलिफे यांनी केली आहे.

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात राजापूरातील कामे अद्यापही अपुर्णच आहेत. पेट्रोलपंपानजीकच्या पुलावरिल रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आलेले नाही. या ठिकाणी जमिन मालकांना पैसे शासनकडून अदा करण्यात आले असून जागा मालकांनीही काम सुरू करण्यास अनुमती दिलेली आहे. मात्र ठेकेदाराने हे काम अद्याप सुरू केलेले नाही. त्यामुळे या परिसरात एकेरी वाहतुक असल्याने अपघातांचा धोका अधिक आहे. राजापूर एसटीडेपो समोरील बंगलवाडीकडे जाणारा जोडरस्ता, बावकर हॉस्पीटलकडील जोडरस्ता ही कामे अद्याप पुर्ण झालेली नाहीत. याबाबत अनेक वेळा प्रत्यक्ष पहाणी करून योग्य पध्दतीने ही कामे करावीत असे सांगण्यात आले होते. महामार्ग विभाग व संबधित ठेकेदाराकडून सदरची कामे पुर्ण करण्याची ग्वाही दिली होती. मात्र अद्याप ही कामे देखील झालेली नाहीत.

राजापूरकरांच्या प्रश्नांकडे कायमच दुर्लक्ष केले जात आहे. या अशा वेळकाढू धोरणामुळे या ठिकाणी अपघात होण्याचा धोका आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष घालावे व ही कामे पुर्ण करावीत, अशी मागणी अॅड. खलिफे यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 12-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow