राजापुर मतदारसंघात नऊ उमेदवारांचे १६ अर्ज ठरले वैध

राजापूर : विधानसभा मतदारसंघात निवडणुकीकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत ९ उमेदवारांचे १७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी एक अर्ज छाननीमध्ये अवैध ठरला आहे. नऊ उमेदवारांचे १६ अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जैसमिन यांनी दिली.

राजापूर निवडणुकीकरिता विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचे चार, शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत यांचे तीन, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश लाड यांचे तीन, तर अपक्ष म्हणून राजेंद्र साळवी यांनी २ आणि संजय यादव, राजश्री यादव, अमृत तांबडे, संदीप जाधव आणि यशवंत हर्याण यांचा प्रत्येकी एक असे एकूण ९ उमेदवारांचे १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्जाच्या छाननीमध्ये अविनाश लाड यांनी सादर केलेल्या तीन अर्जापैकी एक अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. हा अर्ज लाड यांनी काँग्रेसच्या माध्यमातून सादर केला होता. मात्र या अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने तो अवैध ठरविला. त्यांचे अन्य दोन अर्ज वैध ठरविले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 31/Oct/2024

Infigo Eyecare