रत्नागिरी : डिजिटल युगात वाढते सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राजापूर नगर वाचनालयातर्फे ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ५ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे.
या कार्यक्रमात रत्नागिरीतील सायबर सुरक्षा तज्ज्ञ अक्षय फाटक प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते राजापूर नगर वाचनालयाच्या नव्या वेबसाइटचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.
ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकार, मोबाइल आणि इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, तसेच बँकिंग व्यवहार सुरक्षित ठेवण्याबाबत श्री. फाटक नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणारे हे व्याख्यान सर्व नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असून, या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी वाचनालयाचे सभासद तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगर वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:32 29-05-2026













