९ लिटर गावठी दारू जप्त, नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाटे पोलिसांची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई करत नाटे पोलिसांनी बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १८ जुलै रोजी दुपारी २.५० च्या सुमारास राजापूर तालुक्यातील नाणार येथील मेयेकर माळ परिसरात करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी संशयिताकडून ९ लिटर गावठी दारू जप्त केली आहे.
सुरेश दौलत राणे (वय ६१, रा. नाणार, मेयेकर माळ, ता. राजापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित इसमाचे नाव आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धनाजी पांडुरंग पाटील यांनी नाटे पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नाणारकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सुरेश राणे यांच्या घराजवळील आंब्याच्या झाडाखाली बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी गावठी दारू बाळगण्यात आली होती.
छापा टाकून ९ लिटर दारू जप्त; गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीच्या आधारे नाटे पोलिसांनी मेयेकर माळ परिसरातील आंब्याच्या झाडाखाली सापळा रचून तत्काळ छापा टाकला. या छापेमारीदरम्यान संशयिताच्या ताब्यातून सुमारे ९०० रुपये किमतीची ९ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
या प्रकरणी संशयित सुरेश राणे याच्याविरोधात नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 20-07-2026















