प्रसूतीनंतर रक्तदाब अचानक कमी झाल्याने प्रकृती बनली होती गंभीर
चिपळूण : प्रसूतीनंतर प्रकृती खालावल्याने एका ३५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
समृद्धी सुमेध कांबळे (वय ३५, रा. खेड, बावशेवाडी, ता. चिपळूण) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी कांबळे यांना प्रसूतीची वेदना सुरू झाल्याने ८ जुलै रोजी पहाटे चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ९ जुलै रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रियेद्वारे (सिझरियन) प्रसूती करण्यात आली.
मात्र, १० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचा रक्तदाब अचानक प्रचंड कमी झाल्याने त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला होता.
उपचारादरम्यान मृत्यू; पोलिसांकडून गुन्हा नोंद
दुसऱ्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असतानाच, दुर्दैवाने १४ जुलै रोजी रात्री ८.११ वाजता समृद्धी कांबळे यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 20-07-2026















