चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी देवरूख येथील माणिकचौक परिसरात एका चारचाकी चालकाविरुद्ध देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश शांताराम माने (वय ५३, रा. मनिषा निवास, गैरीविहार, सह्याद्रीनगर, ताडवली, ता. संगमेश्वर) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस काँस्टेबल सचिन गोविंद लगारे (वय ३०) यांनी देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, १८ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास माणिकचौक, देवरूख येथे संशयित चालकाने आपल्या ताब्यातील ह्युंदाई कंपनीचे चारचाकी वाहन (क्रमांक MH 08 बीई 2145) दुकानासमोर सार्वजनिक रस्त्यावरच उभे केले होते. यामुळे ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना तसेच पादचारी नागरिकांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई
सार्वजनिक रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहन उभे करून वाहतुकीची कोंडी व अडथळा निर्माण केल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी संशयित चालक राकेश माने याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देवरूख पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 20-07-2026














