पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
रत्नागिरी:
‘Mission Rising Flowers Ratnagiri’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मुकुल माधव विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती व विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षितता, स्वसंरक्षण, वाहतूक शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजवावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
मुकुल माधव विद्यालयात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा उपक्रम
मुकुल माधव विद्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. सादरीकरणाद्वारे त्यांनी पुढील महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले:
- सायबर अवेयरनेस व सुरक्षा: इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी व सायबर गुन्ह्यांपासून बचाव.
- अमली पदार्थविरोधी ‘मिशन फिनिक्स’: व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि सजग राहण्याचे महत्त्व.
- व्यक्तिगत सुरक्षा व नियम: गुड टच-बॅड टचची ओळख, वाहतूक जनजागृती आणि स्वसंरक्षणाचे धडे.
- करिअर मार्गदर्शन: भविष्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, जबाबदार आणि जागरूक नागरिक बनण्याचे आवाहन केले.
पटवर्धन हायस्कूलमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांचे मार्गदर्शन
दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी पटवर्धन हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना याच विषयांवर मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा, अमली पदार्थांचे घातक दुष्परिणाम, वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन, वैयक्तिक सुरक्षितता आणि भविष्यातील करिअर नियोजन या विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:46 22-07-2026














