Ratnagiri Taekwondo Championship: जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत चिपळूण संघ प्रथम; फायट प्रकारात संगमेश्वर द्वितीय तर एसआरके क्लब तृतीय

देवरूख येथे २४ वी सब-ज्युनियर, ज्युनियर व सिनियर स्पर्धा उत्साहात; यशस्वी खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड


साडवली:
Ratnagiri Taekwondo Championship (रत्नागिरी तायक्वांदो स्पर्धा) अंतर्गत रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने पार पडलेल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत चिपळूण तालुक्याने वर्चस्व गाजवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकादमी आणि देवरूख नगर पंचायत तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देवरूख येथील ओमेगा गार्डन हॉल येथे ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेतील ‘फायट’ प्रकारात चिपळूण तालुक्याने प्रथम, संगमेश्वर तालुक्याने द्वितीय तर एसआरके तायक्वांदो क्लबने तृतीय क्रमांक पटकावला.

पुमसे प्रकारात युवा तायक्वांदो क्लब अव्वल
या स्पर्धेतील ‘पुमसे’ प्रकारात युवा तायक्वांदो क्लबने प्रथम, संगमेश्वर तालुक्याने द्वितीय आणि चिपळूण तालुक्याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत २४ वी सब-ज्युनियर व ज्युनियर, ९ वी कॅडेट, २४ वी सिनियर क्यु रोगी तसेच १३ वी सब-ज्युनियर, ९ वी कॅडेट आणि १३ वी ज्युनियर व सिनियर पुमसे तायक्वांदो स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या गुणवंत खेळाडूंची राज्यस्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी अधिकृत निवड झाली आहे.

स्थानिक क्लबचे प्रतिनिधित्व आणि मार्गदर्शक
या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुक्याच्या वतीने संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकादमीअंतर्गत देवरूख नगर पंचायत तायक्वांदो क्लब आणि लायन्स तायक्वांदो क्लब संगमेश्वरच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राष्ट्रीय पंच साईप्रसाद शिंदे, मयुरी राऊत, ओम धाग यांनी काम पाहिले. तालुका अकादमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, जिल्हा संघटना अध्यक्ष व राज्य संघटना खजिनदार व्यंकटेश्वर करां, जिल्हा सचिव लक्ष्मण के, जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी आणि क्लब अध्यक्षा स्मिता लाड, पंच प्रमुख भरत करां यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली.

मान्यवरांची उपस्थिती आणि उद्घाटनाचा सोहळा
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, देवरूख शहराच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, नगर पंचायत मुख्याधिकारी प्रशांत भोसले, तालुक्याच्या सभापती शर्वरी वेले, उपसभापती प्रफुल बाईत, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, क्लब अध्यक्षा स्मिता लाड, क्लब उपाध्यक्षा ॲड. पुनम चव्हाण, जिल्हा संघटना खजिनदार तालुका सचिव शशांक घडशी, रुपाली कदम, बाळू ढवळे, पंकज पुसाळकर, नगरसेवक यशवंत गोपाळ, तालुका अकादमीचे खजिनदार चिन्मय साने, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, पालक प्रतिनिधी आदिती लोध, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमित पवार, साईप्रसाद शिंदे, उपनगराध्यक्ष वैभव पवार, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, दुर्वा मोघे, मृण्मयी सावंत, पिहू कांगणे, पवित्रा मसुरकर, अनुराधा माळी, संकेत मापुस्कर, पंकज मेस्त्री, राहुल चव्हाण, मयुरी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी केंद्र प्रमुख अभिमन्यू शिंदे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 24-07-2026