Golap Sade Theft Case: गोळप सडा येथे सोन्याच्या दोन अंगठ्या लांबवल्या; घरकाम करणाऱ्या महिलेवर चोरीचा गुन्हा

८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी: Golap Sade Theft Case (गोळप सडा चोरी प्रकरण) अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील कुंभारवाडी गोळप सडा येथे घरातील बेडरुममधून सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश शंकर साळवी (वय ६०, व्यवसाय-व्यापार, रा. गोळप कुंभारवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

२ ते १० एप्रिल दरम्यान घडली चोरीची घटना पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ एप्रिल सकाळी १० वाजल्यापासून ते १० एप्रिल रात्री ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घरात ही चोरीची घटना घडली. याप्रकुणी २३ जुलै रोजी रात्री ७ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३’ च्या कलम ३०५ (क) नुसार घरकाम करणाऱ्या संशयित सविता नरेंद्र गावडे (रा. कुंभारवाडी सडा, ता. रत्नागिरी) या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.

८० हजार रुपयांचे दागिने लंपास फिर्यादी यांच्या घरातील बेडरुममधील बेडवर काढून ठेवलेल्या सोन्याच्या दोन अंगठ्या संशयित महिलेने फिर्यादीच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये:

  • १० ग्रॅम वजनाची नवग्रहाची सोन्याची अंगठी
  • १० ग्रॅम वजनाची आडव्या रेषा असलेली चौकोनी डिझाईनची सोन्याची अंगठी अशा एकूण ८०,००० रुपये मूल्याच्या दोन अंगठ्यांचा समावेश आहे.

मुलगी मानल्याने तक्रार देण्यास उशीर फिर्यादी मंगेश साळवी यांच्याकडे घरकामासाठी असणाऱ्या संशयित महिला सविता गावडे हिला ते आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे मानत होते. ती स्वतःहून सोन्याच्या अंगठ्या परत आणून देईल, असा ठाम विश्वास फिर्यादींना वाटत होता. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तात्काळ तक्रार दिली नव्हती. मात्र, बराच काळ वाट पाहूनही दागिने परत न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत गुन्हा नोंदवला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 24-07-2026