मार्कंडी रामतीर्थ परिसरात कारवाई; ९ लिटर गावठी दारू आणि मुद्देमाल जप्त
चिपळूण: Chiplun Liquor Seizure (चिपळूण दारू जप्ती कारवाई): चिपळूण शहरात बेकायदेशीरपणे गावठी दारू बाळगल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शहरातील मार्कंडी रामतीर्थ परिसरात ही कारवाई करण्यात आली.
९ लिटर गावठी दारू आणि मुद्देमाल हस्तगत
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन रमेश चव्हाण (वय ४६, रा. पागझरी रोड, चिपळूण) हा विनापरवाना बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने गावठी दारू बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी मार्कंडी रामतीर्थ परिसरात छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत त्याच्याकडून ९ लिटर गावठी दारू आणि सुमारे ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल
बेकायदेशीरपणे दारू बाळगल्याप्रकरणी सचिन चव्हाण याच्याविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 08-08-2026














