चिपळूण तालुक्यात सर्वाधिक तर मंडणगडमध्ये सर्वात कमी पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. काही तालुक्यांत हलकी संततधार तर काही ठिकाणी पावसाच्या केवळ एक-दोन सरी हजेरी लावत आहेत. दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू असून, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ८९.५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर सरासरी ९.९५ मिमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आजअखेर ७०.३३ टक्के पाऊस झाला असून, गतवर्षी याच कालावधीत तो ९०.५ टक्के इतका झाला होता.
भात व नाचणीची पुनर्लागवड उद्दिष्टापेक्षा अधिक
ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर पावसाचा जोर ओसरला होता, मात्र श्रावण सुरू होताच काही दिवस मुसळधार ते संततधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नद्या आणि धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली असून, जिल्ह्यातील भात आणि नाचणीची पुनर्लागवड उद्दिष्टापेक्षा अधिक झाली आहे. लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आणि गुहागर या तालुक्यांत पावसाची हजेरी समाधानकारक आहे, तर उर्वरित तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (मिमीमध्ये)
| तालुका | पाऊस (मिमी) |
| मंडणगड | ४.२५ |
| दापोली | ७.५७ |
| खेड | ११.१४ |
| गुहागर | १४.०० |
| चिपळूण | २०.४४ |
| संगमेश्वर | ९.०० |
| रत्नागिरी | ६.६६ |
| लांजा | १२.०० |
| राजापूर | ४.५० |
| एकूण | ८९.५६ |
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:58 25-08-2026














