रद्द शुल्क, अतिरिक्त वेळेची आकारणी आणि अनामत रकमेत बदल; शैक्षणिक सहलींना ५०% सवलत कायम
रत्नागिरी: नियमित प्रवाशांच्या भाडेवाढीनंतर आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) लग्नसमारंभ, पर्यटन, धार्मिक यात्रा व खासगी कार्यक्रमांसाठी आरक्षित केल्या जाणाऱ्या विशेष बससेवेच्या दरातही मोठी वाढ केली आहे. महामंडळाकडून किमान आकारणी, रद्द शुल्क, अतिरिक्त वेळेची आकारणी, ई-बससाठीचे स्वतंत्र नियम आणि अनामत रकमेत सुधारणा करण्यात आल्या आहेत. मात्र, शैक्षणिक सहलींसाठी मिळणारी ५० टक्के सवलत पूर्ववत कायम ठेवण्यात आली आहे.
सर्वसामान्यांचे बजेट विस्कळीत होणार
ग्रामीण भागाची ‘जीवनवाहिनी’ मानल्या जाणाऱ्या एसटीला सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय म्हणून अनेक नागरिक खासगी वाहनांऐवजी पसंती देतात. विशेषतः लग्नसोहळे आणि इतर घरगुती कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर एसटी बस बुक केल्या जातात. मात्र, महामंडळाने नियमित तिकीट दरांसोबतच आता खासगी बुकिंगचे दरही वाढवल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलडमडणार आहे.
खासगी वाहतूकदारांच्या तुलनेत पर्याय महाग
खासगी वाहतूकदारांच्या मनमानी भाडेवाढीला कंटाळून नागरिक सुरक्षित पर्याय म्हणून एसटीकडे वळत होते. परंतु, महामंडळाच्या या नवीन प्रवास दर धोरणामुळे आणि अनामत रकमेतील बदलांमुळे खासगी कार्यक्रमांसाठी बस आरक्षित करताना प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:51 25-08-2026














