नवीन बांधलेल्या घराच्या पडवीत घडला प्रकार; कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामार्फत पोलिसांना माहिती
खेड आत्महत्या घटना तालुक्यातील घाणेखूंट येथील धापसेवाडीत समोर आली असून एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या नवीन बांधलेल्या घराच्या पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनिल बारकु धापसे (वय ४० वर्षे, रा. धापसेवाडी, घाणेखूंट, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास घडली. सुनिल धापसे यांनी आपल्या राहत्या धाणेखूंट (धापसेवाडी) येथील नवीन घराच्या पडवीत असलेल्या लोखंडी आळाला निळ्या रंगाच्या नायलॉनच्या रस्सीने गळफास लावून घेतला.
घटनेनंतर तातडीने त्यांना उपचारासाठी नेण्यात आले असता उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर रुग्णालयातील वारसांमार्फत खेड पोलिसांना याबाबतची खबर देण्यात आली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे खेड पोलीस ठाण्यात २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:१५ वाजता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:10 28-08-2026














