१४ वर्षांखालील ४० षटकांच्या ६ सामन्यांची मालिका; रत्नागिरीतील तीन गुणवंत खेळाडूंची निवड
छोटू देसाई अकॅडमी जयपूर रवाना झाली असून, चिपळूण येथील मास्टर क्रिकेट अकॅडमीतर्फे राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित १४ वर्षांखालील ६ सामन्यांच्या मालिकेसाठी खेळाडूंचे प्रयाण झाले आहे. ४०/४० षटकांच्या या मालिकेसाठी रत्नागिरी येथील कै. छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कु. सिद्धार्थ सावंत, कु. वरद सरदेसाई आणि कु. ओजस हर्षे यांचा समावेश असून हे खेळाडू जयपूरसाठी रवाना झाले आहेत. गेल्या वर्षभरात सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, चिपळूण, मुंबई, सांगली आणि कोल्हापूर येथील संघांविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. त्यांच्या या उत्कृष्ट खेळाची दखल घेत मास्टर क्रिकेट अकॅडमी चिपळूण यांनी जयपूर दौऱ्यासाठी त्यांची निवड केली आहे.
अकॅडमीचे प्रशिक्षक रणजीपटू श्री. हरीष लाडे, महेंद्र सुर्वे, दिवाकर मयेकर, विनोद गावखडकर व कु. दर्शना पवार हे खेळाडूंकडून करून घेत असलेल्या कठोर मेहनतीचे हे फलित असल्याचे सचिव श्री. दीपक देसाई यांनी नमूद केले. तसेच अकॅडमीचे अध्यक्ष श्री. गजेंद्रशेठ पाथरे यांनी सर्व निवडक खेळाडूंना या आगामी मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:16 28-08-2026














