सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यावर खेड पोलिसांची महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई
खेड, रत्नागिरी: भोस्ते पुलाजवळील स्मशानभूमीसमोरील मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात खेड पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास भोस्ते पुलाच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीसमोरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. बाळा लक्ष्मण घाणेकर (४५, रा. खोंडे जोगळेवाडी, ता. खेड) हा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळला. त्याच्याकडे मद्यपान करण्यासाठी कोणताही परवाना नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत खेड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई तेजस्विनी जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 03-09-2026














