Horoscope Today 3 September 2026: आज ३ सप्टेंबर २०२६ चे राशीभविष्य; गुरुवारी ग्रहांचे मोठे संक्रमण, जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

काही राशींवर होणार धनवर्षाव, तर काहींना सावधानतेचा इशारा

आज गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी वैदिक ज्योतिषाच्या दृष्टीने ग्रहांची विशेष स्थिती निर्माण होत आहे. अनेक राजयोगांसह आज ग्रहांचे संक्रमण होत असून, हा दिवस दत्तगुरूंना समर्पित आहे. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस १२ राशींसाठी आर्थिक, व्यावसायिक व कौटुंबिक दृष्टीने कसा राहील, याचा सविस्तर आढावा.

१. मेष रास (Aries) मेष राशीसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम राहील. आज तुमच्यावर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे; मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रॉपर्टीसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.

२. वृषभ रास (Taurus) आर्थिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी ठरेल. भाग्याची भक्कम साथ लाभेल आणि नवीन महत्त्वाचे प्रोजेक्ट्स हाती येतील. आई-वडिलांचा आशीर्वाद व जोडीदाराचा मोलाचा सहभाग प्रत्येक कार्यात यश देईल. एखादी महत्त्वाची बातमी किंवा माहिती तुमच्या हाती लागू शकते.

३. मिथुन रास (Gemini) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या व वादळांतून आज सुटका होईल. परिस्थिती अनुकूल होताना दिसेल. व्यवसायात अधिक लक्ष केंद्रित करून काम कराल, ज्यामुळे चांगला फायदा संभवतो.

४. कर्क रास (Cancer) कर्क राशीसाठी आजचा दिवस सामान्य राहील. ना फार मोठा लाभ ना तोटा, अशी स्थिती असेल. जे काम करत आहात ते प्रामाणिकपणे करत राहा. विरोधक सक्रिय असल्याने छोटीशी चूकही भविष्यावर परिणाम करू शकते, त्यामुळे सतर्क राहा.

५. सिंह रास (Leo) आत्मविश्वास वाढवणारा हा दिवस आहे. तथापि, आपल्या वाणीवर पूर्ण नियंत्रण ठेवावे लागेल, जेणेकरून कोणी दुखावले जाणार नाही. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य कमी पडू शकते, त्यामुळे स्वबळावर आणि मेहनतीने काम पूर्ण करा.

६. कन्या रास (Virgo) कन्या राशीच्या लोकांनी आज अत्यंत सावध राहावे. भूतकाळातील काही गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात. चुका झाल्या असल्यास वेळीच कबुली देणे फायद्याचे ठरेल. आज कोणत्याही नवीन प्रोजेक्टची सुरुवात करणे टाळावे.

७. तूळ रास (Libra) आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि कामाच्या निमित्ताने प्रवास घडेल. मुलांच्या कलागुणांचा विकास होईल. केलेल्या मेहनतीचे फळ मिळून एखादी आनंदवार्ता कानावर पडण्याची दाट शक्यता आहे.

८. वृश्चिक रास (Scorpio) आज धैर्य आणि संयम राखण्याची गरज आहे. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात. महत्त्वाचे निर्णय किंवा मोठी जोखीम आज टाळलेलीच बरी. घरगुती कामात सहभाग वाढवा.

९. धनु रास (Sagittarius) कामाच्या व्यापामुळे आजचा दिवस व्यस्ततेचा आणि ताणाचा राहील. आरोग्याची काळजी घेऊन वेळेवर झोप घेणे गरजेचे आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता असून, काही आश्चर्यकारक घटना घडू शकतात.

१०. मकर रास (Capricorn) आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा असेल. एखाद्या कामासंदर्भात सतत चिंता सतावत राहील, ज्यामुळे एकाग्रता भंग होऊ शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनी आज सावध राहावे, नुकसान होण्याची शक्यता आहे.

११. कुंभ रास (Aquarius) प्रगतीकारक असा आजचा दिवस आहे. नोकरदारांना पदोन्नती (प्रमोशन) मिळण्याचे संकेत आहेत. सरकारी योजनांशी संबंधित कामे पूर्ण होतील तसेच परदेश प्रवासाची संधी चालून येईल. नवीन प्रोजेक्ट्स हाती लागतील.

१२. मीन रास (Pisces) मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा राहील. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांच्या सहकार्याने अनेक मार्ग मोकळे होतील. संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभाग घेता येईल व वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होईल.

(टीप : वरील सर्व बाबी रत्नागिरी खबरदार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 03-09-2026