निवाचा चौक येथे रस्त्याच्या मध्यभागी टाटा ४०७ मालवाहू गाडी उभी केल्याने कारवाई
Khed Market Traffic Obstruction Case: खेड बाजारपेठेतील गजबजलेल्या निवाचा चौक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर मालवाहू गाडी धोकादायक पद्धतीने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी १२:५० च्या सुमारास निवाचा चौक, खेड बाजारपेठ येथे घडली. संशयित चालक प्रवीण शिवराम सावंत (रा. कुशेवाडा, परुळे, जि. सिंधुदुर्ग) याने त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीची ४०७ मालवाहू चारचाकी गाडी (क्र. एमएच ०४ एस ४४९४) रस्त्याच्या मध्यभागी अशा धोकादायक स्थितीत उभी केली होती, ज्यामुळे ये-जा करणाऱ्या इतर वाहनांना तसेच सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकत होता.
रस्त्याच्या मधोमध गाडी सोडून वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस शिपाई कृष्णा गावित यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित चालकाविरोधात रीतसर गुन्हा नोंदवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 04-09-2026














