इतर वाहनांना व पादचाऱ्यांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गाड्या उभ्या केल्याने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद
Mirjole MIDC Traffic Obstruction Case: रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे-एमआयडीसी परिसरातील रस्त्यावर इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा तसेच धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने दोन कार उभ्या केल्याप्रकरणी दोन चालकांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार, २ सप्टेंबर रोजी दुपारी १.२० ते १.३५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी संदेश राजेंद्र आंग्रे (वय ४२, रा. शिरगाव, शिवरेवाडी) यांनी त्यांच्या ताब्यातील कार (क्र. एमएच-०८-एफ-१०००), तर चंद्रकांत भिकाजी झोरे (वय ५२, रा. हरचेरी, धनगरवाडी, रत्नागिरी) यांनी त्यांच्या ताब्यातील कार (क्र. एमएच-०४-एचएफ-७०८१) मिरजोळे-एमआयडीसी येथील रस्त्यावर अत्यंत निष्काळजीपणे उभी केली होती.
या वाहनांमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या इतर वाहनांच्या वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोन्ही कारचालकांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 04-09-2026














