Borghar Public Drinking Action: बोरघर बसस्टॉपजवळ सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; एकावर खेड पोलिसांत गुन्हा दाखल

गोवा-मुंबई महामार्गालगत विनापरवाना मद्यपान करताना आढळल्याने कारवाई; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद

Borghar Public Drinking Action: खेड तालुक्यातील बोरघर बसस्टॉपजवळ सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यपान केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, महामार्गालगत उघड्यावर मद्यपान करणाऱ्या चालकांवर व व्यक्तींवर पोलिसांनी कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोवा ते मुंबई जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्या बोरघर बसस्टॉपजवळील मोकळ्या जागेत गोविंद सुरेश पवार (वय ३८, रा. बोरघर बौद्धवाडी, ता. खेड) हा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना पोलिसांना आढळून आला.

पोलिसांनी चौकशी केली असता मद्यपानासाठी त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवल्याप्रकरणी त्याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान कोणताही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही.

सार्वजनिक ठिकाणी, महामार्गालगत किंवा बसस्टॉप परिसरात मद्यपान करून उपद्रव घडवणाऱ्यांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा खेड पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 04-09-2026