मेर्वी बसस्टॉप समोरील घटना
रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे इतर वाहनांच्या आणि प्रवाशांच्या वाहतुकीस अडथळा तसेच धोका निर्माण होईल अशा पद्धतीने आपली टाटा सुमो गाडी उभी करणाऱ्या एका चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता करण्यात आली.
यासिन अब्दुल रशीद हुना (वय ४५, रा. साखरी नाटे, राजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित टाटा सुमो चालकाचे नाव आहे. याप्रकरणी श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संजय शिवगण यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे.
रस्त्यावर गाडी उभी करून वाहतुकीस अडथळा
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी संशयित चालक यासिन हुना याने आपल्या ताब्यातील टाटा सुमो गाडी (क्रमांक एमएच-०८-सी-८६६९) ही पावस ते आडिवरे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील मेर्वी बसस्टॉप समोर निष्काळजीपणे उभी केली होती. या वाहनामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांच्या वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
याची दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:54 11-09-2026














