Maharashtra Rain Weather Forecast: राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा!

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय; उत्तर महाराष्ट्रात रविवारी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होत असून पुढील दोन दिवस राज्यात पावसाची तीव्रता वाढणार आहे. हवामान विभागाने रविवारी उत्तर महाराष्ट्रासाठी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राचा महाराष्ट्रावर प्रभाव

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ओडिशा तसेच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या हवामान प्रणालीचा थेट प्रभाव महाराष्ट्रातील वातावरणावर दिसून येत आहे.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर

शनिवारी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 12-09-2026