आजचे राशीभविष्य (१२ सप्टेंबर २०२६): शनिवारच्या दिवशी १२ राशींचे भाग्य कसे असेल? पाहा सविस्तर अपडेट

शनिदेवाच्या कृपेने काही राशींना प्रगतीची संधी, तर काहींना सावधानतेचा इशारा; वाचा सर्व राशींचे फलित

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज १२ सप्टेंबर २०२६, शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार आजचा दिवस सर्व १२ राशींच्या लोकांसाठी विविध बदल आणि संधी घेऊन आला आहे.

मेष ते मीन: सर्व १२ राशींचे आजचे भविष्य

  • मेष रास: आजचा दिवस सामान्य राहील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमात अहंकार टाळा आणि नवीन निर्णय घेताना सावधानता बाळगा.
  • वृषभ रास: व्यवसायाचा विस्तार होईल आणि नोकरदारांना नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस सामान्य असून कलागुणांना वाव मिळेल.
  • मिथुन रास: जुन्या मित्राच्या भेटीने जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. व्यवसायात नवीन करार संभवतात आणि संपत्तीचे नवीन मार्ग सापडतील.
  • कर्क रास: वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. वैवाहिक जीवन सुखी राहील आणि आत्मविश्वासात वाढ होईल.
  • सिंह रास: व्यवसायात दिग्गजांचे सहकार्य लाभेल. कामाच्या निमित्ताने प्रवास घडेल आणि नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस शुभ आहे.
  • कन्या रास: प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल आणि प्रगतीचे नवे संकेत मिळतील.
  • तूळ रास: दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. व्यवहारात इतरांचा विचार करून निर्णय घेतल्यास अधिक लाभदायी ठरेल.
  • वृश्चिक रास: दिवसाची सुरुवात छान होईल, मात्र उत्तरार्धात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आत्मविश्वासाने परिस्थिती हाताळा.
  • धनु रास: रखडलेली कामे मार्गी लागतील आणि शुभ बातमी मिळेल. प्रवासाचे योग असून आळस दूर ठेवल्यास यश नक्की मिळेल.
  • मकर रास: शेअर बाजारात गुंतवणूक करणे टाळावे, धनहानीची शक्यता आहे. व्यवसाय सुरळीत चालेल.
  • कुंभ रास: दिवसाच्या उत्तरार्धात विचारांची गोंधळलेली स्थिती निर्माण होऊ शकते. संयम बाळगणे हितकारक ठरेल.
  • मीन रास: आर्थिक स्थिती भक्कम राहील. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊन परस्पर संबंध सुधारतील.

(टीप : वरील सर्व बाबी रत्नागिरी खबरदार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 12-09-2026