शुक्रवारी देवी लक्ष्मी आणि महादेवाच्या कृपेने कुणाला मिळणार लाभ? वाचा आजचे दैनिक राशीभविष्य
मुंबई
Horoscope Today 11 September 2026: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज ११ सप्टेंबर २०२६ हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित शुक्रवारचा दिवस आहे. ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने सर्व १२ राशींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. मेष ते मीन या सर्व राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, याचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे.
मेष ते कर्क राशीभविष्य
- मेष रास: आजचा दिवस सकारात्मकतेने सुरू होईल. विचारांमध्ये स्थिरता राहील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळण्याची शक्यता आहे.
- वृषभ रास: नोकरीत चांगली प्रगती दिसून येईल आणि व्यवहार सुरळीत चालतील. महत्त्वाच्या निर्णयांमुळे वरिष्ठांची (बॉस) प्रशंसा लाभेल.
- मिथुन रास: आज अचानक धनलाभाची शक्यता असून व्यवसायाचा विस्तार होईल. संध्याकाळी मित्रांसोबत आनंदात वेळ घालवाल.
- कर्क रास: दिवस काहीसा आव्हानात्मक राहू शकतो. मनासारख्या गोष्टी न घडल्याने राग वाढण्याची शक्यता असल्याने संयम ठेवावा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहावे.
सिंह ते वृश्चिक राशीभविष्य
- सिंह रास: आजचा दिवस सामान्य राहील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात व्यतीत होईल.
- कन्या रास: जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो तसेच घरात शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
- तूळ रास: रखडलेली कामे वेळेत पूर्ण होतील. प्रवासाचे योग असून मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
- वृश्चिक रास: दिवसाची सुरुवात चांगली होईल, मात्र दिवसाचा शेवट काहीसा निराशाजनक राहू शकतो. मोठी जोखीम घेणे टाळावे.
धनु ते मीन राशीभविष्य
- धनु रास: महादेवाच्या कृपेने मोठ्या संकटातून सुटका होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन व्यवसायाचा विस्तार होईल.
- मकर रास: जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता असल्याने योग्य नियोजन करा. घेतलेल्या निर्णयांचे समाजात कौतुक होईल.
- कुंभ रास: शत्रूंवर विजय मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. मुलांच्या आरोग्याबाबत दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
- मीन रास: दिवसाची सुरुवात अत्यंत सकारात्मक आणि प्रसन्न राहील. मुलांच्या संदर्भात एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी रत्नागिरी खबरदार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 11-09-2026














