युडायसच्या नोंदीनुसार पुस्तकांचे वाटप पूर्ण; विद्यार्थी संख्या वाढल्याने हजारो पुस्तकांची अतिरिक्त मागणी
रत्नागिरी:
Ratnagiri School Textbooks Shortage मुळे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक पाठ्यपुस्तके अद्याप मिळालेली नाहीत. विशेषतः उर्दू आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना या समस्येचा मोठा फटका बसला असून पुस्तकांअभावी त्यांना अभ्यासात अडचणींचा सामना करावा लागत आहे. अभ्यासक्रम बदलामुळे नव्या पुस्तकांची गरजराज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवली जातात. यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आल्यामुळे नवीन पाठ्यपुस्तकांची आवश्यकता वाढली आहे. ही पुस्तके मे महिन्यातच उपलब्ध होणे अपेक्षित होते; मात्र शाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी पुस्तकांचा तुटवडा कायम आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, युडायस (UDISE) प्रणालीतील नोंदींनुसार जिल्ह्यातील जि.प. शाळांना १०० टक्के पुस्तकांचे वाटप झाले आहे. मात्र, रत्नागिरीसह लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि दापोली तालुक्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे अतिरिक्त पुस्तकांची गरज निर्माण झाली आहे. सहावीच्या मराठी माध्यमातील बालभारती, सेमी इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण तसेच उर्दू माध्यमातील तिसरी, चौथी आणि सहावीच्या पुस्तकांची मोठी टंचाई आहे. Ratnagiri School Textbooks Shortage आणि बालभारतीकडे मागणीकाही शाळांमध्ये यूपी, बिहार तसेच नेपाळी विद्यार्थी दाखल झाले आहेत. तसेच माध्यमनिहाय अतिरिक्त पुस्तकांची गरज निर्माण झाल्याने तुटवडा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने विविध तालुक्यांतून जास्त लागणाऱ्या पुस्तकांची यादी मागवली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बालभारतीकडे हजारो अतिरिक्त पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवली आहे. लवकरच ही पुस्तके प्राप्त होतील, असे आश्वासन शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले असले, तरी सध्यातरी शिक्षकांना पाठ्यपुस्तकांशिवायच अध्यापन करावे लागत आहे.













