परवाना नसताना भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल; पोलिसांची धडक कारवाई
राजापूर:
Anuskura Ghat Illegal Transport प्रकरणी कोल्हापूर-देवरुख मार्गावरील अणुस्कुरा घाटातील अवघड वळणावर विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकावर राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैध परवाना नसताना तब्बल २० प्रवाशांची वाहतूक करताना टेम्पोचालक आढळून आला आहे. घाटातील धोकादायक वळणावर वेगावर नियंत्रण न ठेवता बेदरकारपणे वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याने ही कारवाई करण्यात आली. अवघड वळणावर भरधाव वेगाने वाहन, पोलिसांच्या पाहणीत प्रकार उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष प्रकाश वास्कर (वय ४१, रा. वास्करवाडी, देवरूख) हा टाटा ९०९ टेम्पो (MH 04 CU 0566) घेऊन कोल्हापूरहून देवरूखच्या दिशेने जात होता. बुधवारी (दि. १६) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अणुस्कुरा घाटातील एका अवघड वळणावरील उतारावर त्याने वाहनाच्या वेगावर नियंत्रण न ठेवता बेदरकारपणे वाहन चालवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याचवेळी टेम्पोची पाहणी केली असता, त्यात प्रवासी वाहतुकीचा कोणताही वैध परवाना (परमिट) नसतानाही तब्बल २० प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. घाटातील अवघड वळणे आणि तीव्र उताराचा विचार न करता भरधाव वाहन चालविल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. Anuskura Ghat Illegal Transport प्रकरणी राजापूर ठाण्यात गुन्हा नोंद या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील प्रताप घाटगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि ६६/१९२ अन्वये ही कारवाई करण्यात आली असून, राजापूर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.














