राजभवनातील कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते मिठाई वाटप; जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येण्याची व्यक्त केली मनीषा
Governor Jishnu Dev Varma Diwali Wishes: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी राज्यातील संपूर्ण जनतेला धनत्रयोदशी तसेच दीपावलीच्या पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. वसुबारस आणि धनत्रयोदशीपासून सुरू होणारा हा दीपावलीचा दीपोत्सव सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, अशी प्रार्थना राज्यपालांनी आपल्या संदेशात केली आहे.
दीपावलीनिमित्त बोलताना राज्यपालांनी राज्यातील सर्व नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून सर्वांना या प्रकाशाच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राजभवनातील कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप
दीपावलीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते राजभवनातील कंत्राटी कामगार, कर्मचारी, पोलीस दल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कर्मचारी तसेच इतर विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. सणाच्या आनंदाच्या क्षणी कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत राज्यपालांनी त्यांना दिवाळीचा गोडवा वाटला.














